Sunday, 19 July 2020

सदगुणकथा- विद्या उजळली






गोष्टीवर आधारित प्रश्न

१) नदीच्या काठावर कोणाचा आश्रम होता?
२) गुरुजींनी काय ठरवले?
३) परीक्षा घेण्यासाठी गुरुजींनी  काय केले?
४) गुरुजींना कोणत्या शिष्याचे वागणे आवडले? व का?
५) या गोष्टीतून तुम्हांला  काय बोध मिळाला? कोणता गुण समजला ?
६) या गोष्टीच्या लेखकांचे नाव काय? व या गोष्टीला तुम्ही काय नाव देणार ?

Tuesday, 14 July 2020

सदगुणकथा- धाडसीपणा - शैलेंद्र

सदगुणकथा- धाडसीपणा - शिरीष कुमार


कथेवरील प्रश्न-


१) शिरीष कुमार चा जन्म कोणत्या गावी झाला?
२) शिरीष कुमार च्या आईचे नाव काय होते?
३)शिरीष कुमारवर कोणाचा प्रभाव होता?
४)शिरीष कुमारची मातृभाषा कोणती ?
५)पोलीस अधिकाऱ्यांला शिरीष कुमारने कोणते आवाहन केले?
६)या कथेतून तुम्ही काय शिकलात?


Friday, 10 July 2020

तिसरी (क )शरद गट वेळापत्रक -सन (2020-21)

तिसरी (क )शरद गट वेळापत्रक -सन (2020-21)
 वर्गशिक्षिका - सौ.स्मिता आगळे
  
 सोमवार ते गुरुवार ऑनलाईन तास घेतले जातील .


 *सोमवार :   1)गणित -   12 ते12.40
   2) गणित - 12.50ते 1.30

 *मंगळवार     1)eng-12 ते 12.40
    2)eng  -12.50 ते1.30

 *बुधवार :   1)परिसर -12 ते 12.40
   2)परिसर -12.50 ते 1.30
  

 *गुरुवार   1)मराठी-12 ते 12.40
  2)मराठी-12.50 ते 1.30

 पुढील दोन दिवस offline म्हणजेच कार्यप्रत्रके व Video पाठवले जातील.
 *शुक्रवार   1)मराठी
  2)परिसर

 *शनिवार    1) चित्रकला:
   2) हस्तकला

मराठी कार्यपत्रक ४



Thursday, 9 July 2020

मनाचे श्लोक



॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥

मना वासना दुष्ट कामा न ये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सार वीचार राहो॥४॥

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥
मना कल्पना ते नको वीषयांची।
विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥

नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु॥६॥

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।
मना बोलणे नीच सोशीत जावें॥
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांसि रे नीववावें॥७॥

देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे।
परी अंतरीं सज्जना नीववावे॥८॥

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे।
न होतां मनासारिखें दु:ख मोठे॥९॥

सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी।
दुःखाची स्वयें सांडि जीवी करावी॥
देहेदु:ख ते सूख मानीत जावे।
विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें॥१०॥
__________________________________________________________

जनीं सर्वसूखी असा कोण आहे।
विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।
तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥

मना मानसीं दु:ख आणूं नको रे।
मना सर्वथा शोक चिंता नको रे॥
विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी।
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी॥१२॥

मना सांग पां राखणा काय जाले।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥
म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं।
बळे लागला काळ हा पाठिलागी॥१३॥

जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला।
परी शेवटीं काळमूखीं निमाला॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले।
कितीएक ते जन्मले आणि मेले॥१४॥

मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी।
जितां बोलती सर्वही जीव मी मी॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती॥१५॥

Wednesday, 8 July 2020

कोरोना व्हायरस आणि ऑनलाईन शिक्षणपद्धती

कोरोना व्हायरस आणि ऑनलाईन शिक्षणपद्धती 

- मा. श्री मनोज देवळेकर (ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्रप्रमुख )